राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्वेतांबरी रजपूत…

राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्वेतांबरी रजपूत…

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जिल्हा विस्तृत कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली.यात उपाध्यक्षपदी श्वेतांबरी रजपूत यांना संधी देण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसची बैठक आज पार पडली.यावेळी जिल्हा युवती अध्यक्ष संपदा तुळसकर यांनी युवती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.दरम्यान सरचिटणीस पदी नम्रता चव्हाण,मालवण तालुकाध्यक्ष पदी तन्वी आंद्रे, कणकली तालुकाध्यक्ष पदी प्राजक्ता शिंदे, कुडाळ तालुकाध्यक्ष पदी हेमांगी वराडकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदि श्रद्धा राऊळ यांची निवड करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.सामंत, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर,सरचिटणीस ऍड.हितेश कुडाळकर, हमीद शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा