You are currently viewing लोरे पं.स. मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय
Oplus_16908288

लोरे पं.स. मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय

मानसी मराठे २,१०४ मतांच्या स्पष्ट फरकाने विजयी; ठाकरे गटाचा पराभव

कणकवली :

लोरे पंचायत समिती मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मानसी मराठे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मानसी मराठे यांना एकूण २,७८२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार किर्ती एकावडे यांना केवळ ६७८ मते मिळाली, तर नोटा ला ४९ मते पडली.

या मतदारसंघात एकूण ३,५०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मानसी मराठे यांनी २,१०४ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. या विजयामुळे लोरे परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निकाल जाहीर होताच जल्लोष करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा