कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
यावेळी आमदार राणे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संस्था मोलाच्या भूमिका बजावतात. या संस्थांमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन निर्माण व्हावे, यासाठी आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील सर्व बंधू-भगिनींनी कोणताही अपवाद न करता आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहनही आमदार निलेश राणे यांनी केले.
