नवी मुंबई :
जळगावच्या / नेरूळ नवी मुंबईच्या सुपरिचित लेखिका कवयित्री शैलजा करोडे यांना नुकतेच दिशा महाराष्टाची या यू ट्यूब चॅनेल यांनी त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी साहित्य भूषण 2026 या पुलस्काराने सन्मानित करण्यात आले. शैलजा करोडे यांची नुकतीच तीन पुस्तकं 1) माणुसकी—कथासंग्रह 2) हुंकार काळजाचा—कवितासंग्रह 3)निशिगंध —ललित लेख संग्रह प्रकाशित झाले असून आतापर्यंत त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित आहेत. समाजाच्या सर्व स्तरातून शैलजा करोडे यांचे अभिनंदन होत आहे.
