तोंडवली बावशीत उबाठा सेना “खालसा”
*ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत
कणकवली :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला मोठा धक्का बसत असून तोंडवली बावशी येथे उबाठा सेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. तोंडवली बावशी येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तसेच अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री तथा भाजप नेते नामदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनश्री हेमंत कांडर (ग्रामपंचायत सदस्य, तोंडवली बावशी), हेमंत सुरेश कांडर (तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष), मोहण बाळकृष्ण खडपे, जनार्दन बाळकृष्ण खडपे, सविता खडपे, दिगंबर सुरेश कांडर, करण भार्गव कांडर, तात्या तेली, संतोष तेली, लक्ष्मण तेली, संगिता तेली, वासुदेव तेली, राजेंद्र कांडर, नामदेव कांडर व उद्धव कांडर बुवा यांचा समावेश आहे.
