You are currently viewing संविता आश्रमात बहुपयोगी वस्तूंचे वाटप ; पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

संविता आश्रमात बहुपयोगी वस्तूंचे वाटप ; पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

संविता आश्रमात बहुपयोगी वस्तूंचे वाटप ; पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

कुडाळ

पणदुर येथील संविता आश्रमातील अनाथ बांधवांना श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या विद्यमान विद्यार्थी व माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने बहुपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनाथ बांधवांप्रती आपुलकी व जबाबदारीची भावना व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमातील अनाथ बांधवांना भेट देत त्यांच्याशी हितगुज साधले. तसेच आश्रमाच्या सेवाकार्याविषयी व्यवस्थापक बापू सावंत यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला भेट

यापूर्वी विद्यार्थ्यांनी जीवन आनंद संस्थेच्या किनळोस येथील सक्षम आश्रमाच्या शेती व कुक्कुटपालन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्प व्यवस्थापक श्री. कामत यांनी प्रकल्पाची माहिती देत उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.

या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडुरकर, सदस्य प्रकाश चव्हाण, सौ. हर्षदा ठाकुर तसेच सहाय्यक प्राध्यापक गणु गावडे हे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ. नुतन परब व प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अनाथ बांधवांविषयी जागृकता व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा