You are currently viewing कास (दाभाळवाडी) येथील भरवस्तीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद    

कास (दाभाळवाडी) येथील भरवस्तीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद  

कास (दाभाळवाडी) येथील भरवस्तीत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

बांदा

कास (दाभाळवाडी)परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून भरवस्तीत दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने यशस्वीरीत्या जेरबंद केले. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे व वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सदर बिबट्याने परिसरात पाच ते सहा पाळीव कुत्रे तसेच बकऱ्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष केले होते. वारंवार बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
सध्या काजूचा हंगाम सुरू असून, बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ काजू बागांमध्ये जाण्यास घाबरत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या थेट घरांच्या अंगणात येऊन भक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत वाढली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार काल सायंकाळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता भक्षाच्या शोधात आलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात ठेवलेल्या बकरीवर झडप घातली असता तो पिंजऱ्यात अडकला आणि यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आला.
या कारवाईदरम्यान सुभाष भाईप, योगेश भाईप, शुभम फाटक, आनंद राणे, देवेंद्र परब, गोपाळ सावंत, राकेश आम्रुसकर, वनरक्षक प्रकाश रानगीर व वनसेवक चंद्रकांत पडते यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा