You are currently viewing ग्रामीण शिक्षणासाठी स्वामी समर्थ मठाचा पुढाकार

ग्रामीण शिक्षणासाठी स्वामी समर्थ मठाचा पुढाकार

*ग्रामीण शिक्षणासाठी स्वामी समर्थ मठाचा पुढाकार*

*घारपी शाळेला शाळेला शैक्षणिक मदत*

*बांदा*

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासासाठी घारपी येथील स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शाळेला रोख दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच शाळेतील आवश्यक सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.यासोबतच सरमळे नांगरतास येथील भजनी बुवा संजय गावडे यांनीही शाळेच्या कार्यासाठी रोख एक हजार रुपयांचा मदतनिधी देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
शाळेसाठी ही मदत मुख्याध्यापक जे.डीपाटील यांच्याकठे घारपी येथील स्वामी समर्थ मठाचे प्रमुख विजय गावकर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालकी सोबत आलेले श्री कुलकर्णी , स्वामी समर्थ भक्त ज्ञानेश्वर सावंत ,महेश‌ नाईक,शिवराम गावडे , संजय गावडे ,अजित मयेकर,ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, उपशिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे,धर्मराज खंडागळे तसेच स्वामी समर्थ भक्त यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
शिक्षणाच्या क्षेत्रात अशा प्रकारचे योगदान हे प्रेरणादायी असून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही पुढे यावे असे .
या आर्थिक मदतीमुळे शाळेतील वर्गखोल्यांमधील आवश्यक साहित्य, शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी लागणारी साधनसामग्री तसेच इतर भौतिक गरजांसाठी निधीचा उपयोग केला जाणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी स्वामी समर्थ मठाचे विशेष आभार मानले. समाजातील अशा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा