You are currently viewing ५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु

५ एप्रिल पासून दुचाकी संवर्गासाठी एक्यु ही नविन मालिका सुरु

सिंधुदुर्गनगरी 

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी संवर्गासाठी सुरु होत असलेल्या एक्यू या मालिकेतील महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४-अ मध्ये राखीव ठेवण्यात आलेली नोंदणी चिन्हे व अनाकर्षक नोंदणी क्रमांक विहीत केलेले शुल्क भरुन राखीव करण्यात यावेत, तरी जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.

            संगणकीय अभिलेख्यावर दुचाकी संवर्गासाठी सध्या सुरु असलेल्या ए.पी या मालिकेत सध्या ९५५९ हा नोंदणी क्रमांक सुरु असून या मालिका पुढील आठवड्यात साधारणता ४ एप्रिल २०२२ पर्यंत संपेल असा अंदाज असून त्यानंतर दिनांक ५ एप्रिल २०२२ पासून वाहन वितरकांना दुचाकी नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु करण्यात अनिवार्य आहे.  वाहन ४.० या संगणक प्रणालीवर दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी सध्या सुरु असलेल्या ए.पी या मालिकेतील अंतीम नोंदणी क्रमांक जारी केल्यानंतर एक्यु ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५४ मध्ये नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्याबाबत तरतुद विहीत करण्यात आलेली आहे. या नियमातील नियम अ (३) मध्ये शासनाने विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे फी प्रदान केल्यावर,नोंदणी चिन्हांमधून मोटार वाहनांच्या मालकासाठी त्यांच्या पसंतीचे नोंदणी चिन्ह राखून ठेवील तसेच नियम अ (७) मध्ये निनिर्दिष्ट केलेल्या फीच्या तिप्पट दराने फीचे प्रदान केल्यावर, वाहनाच्या कोणत्याही वर्गासाठी, इतर कोणत्याही मालिकेतून नोंदणी चिन्हे नेमून देता येतील याप्रमाणे तरतुद केलेली आहे. अशी माहिती श्री काळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 4 =