*प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण! – डाॅ. रोहिदास आल्हाट*
*क्रांतितीर्थ येथे प्रजासत्ताक दिन साजरा*
पिंपरी
‘प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. यानिमित्त प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे!’ असे आवाहन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. रोहिदास आल्हाट यांनी क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्यात डाॅ. रोहिदास आल्हाट बोलत होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, समिती कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, समितीचे विश्वस्त मधुसूदन जाधव, नवनिर्वाचित नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, डाॅ. माधुरी आल्हाट,
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डाॅ. शकुंतला बन्सल, समिती सदस्य नितीन बारणे, सुहास पोफळे, हेमराज चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वासंती तिकोणे, चिंचवड पश्चिम नगर कार्यवाह अविनाश आगज्ञान, सहकार्यवाह अतुल सुबंध आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. रोहिदास आल्हाट यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरक समजावून सांगितला. ॲड. सतिश गोरडे यांनी प्रास्ताविकातून, ‘२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. आपले संविधान लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे असल्याने दहशतवादी शक्तींना त्याची भीती वाटते. त्यामुळेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेक्यांनी हल्ला केला होता; परंतु अशा घटनांनी डगमगून न जाता देशाची विश्वगुरू पदाकडे वाटचाल सुरू आहे!’ अशी माहिती दिली.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितांसह बँडच्या तालावर सामुदायिक राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायन करून ध्वजवंदन केले; तसेच राष्ट्रभक्तिपर जयघोष केला. त्यानंतर हर्षदा धुमाळ यांनी क्रांतितीर्थ येथील प्रदर्शनाच्या माध्यमातून क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या देशकार्याची माहिती दिली.
व्यवस्थापक अतुल आडे, मुख्याध्यापिका वर्षा जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकर्ते, तसेच विशाल पाटील, सागर शेवाळे, आशा मस्के, किरण गायकवाड, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक विनोद देशपांडे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
