मनसेला लागलेल्या त्या बांडगुळांनी, चमकुगिरी करणाऱ्यांनी  शिवसेनेला शिकवू नये…

मनसेला लागलेल्या त्या बांडगुळांनी, चमकुगिरी करणाऱ्यांनी  शिवसेनेला शिकवू नये…

– युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांची टीका……

मनसेने आमदार वैभव नाईक यांच्यावर जी टीका केली, म्हणे तलवारीने केक कापला,  मनसेच्या त्या पदाधिकाऱ्यांनी म्हणण्यापेक्षा RTI कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेत माहितीच्या अधिकारी अर्ज करावा. शिवसैनिक तुम्हाला योग्य ती माहिती देतील, शिवसैनिकांनी आपल्या प्रेमापोटी आमदार वैभव नाईक यांच्या प्रेमाखातर तसेच जनसामान्यांच रक्षण करण्यासाठी ही तलवार दिली, आता ते ह्यांना काय कळणार?  कार्यकर्त्यांच प्रेम काय असत?

जे टीका करता आहेत त्यांनी 4 गावडे 1 टँकसली ह्याच्यापालिकडे संघटना वाढवावी. उठसुठ माहिती मागवण्यापेक्षा लोकांची काम करावीत. RTI चा वापर करून स्वतःचे पोट भरणा-यानी  जनतेची सेवा करावी. स्वतःच्या गावात ज्यांना 10 मत मिळू न शकणार्यांनी आमदारांच्या कार्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यावर बोलायची कुवत नाही.  पहिली स्वतःची पात्रता सिद्ध करा, चमकुशगिरी बंद करा अशी टीका युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा