जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक :
शिरगावात श्री पावणाई देवीच्या चरणी भाजप–शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
देवगड
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शिरगाव गावची ग्रामदैवता श्री पावणाई देवीच्या देवालयात पार पडला. देवालयात श्रीफळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला.
या निवडणुकीत शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार कु. शितल सुरेश तावडे तसेच तळवडे पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ. सलोनी संतोष तळवडेकर यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. धार्मिक विधी आणि सामूहिक प्रार्थना करून प्रचाराला प्रारंभ झाला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकसंघपणे निवडणूक लढवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्यासह मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार, अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश कांडर यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
