You are currently viewing बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ “अभ्युदयनगरचा गणराज” यांच्या वतीने, के.ई.एम. रुग्णालयाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला स्थानिक समाजाकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १९५ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या रक्तदान केले. काही रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, परंतु वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करता आले नाही, तरी त्यांचे योगदानही मनःपूर्वक मानले गेले. मंडळाने या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त केले.

सदरहू रक्तदान शिबिरात शिवसेना (ठाकरे) दादरचे आमदार महेश सावंत, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीरभाऊ साळवी, नव निर्वाचित नगरसेवक/नगरसेविका सुप्रिया दळवी, तसेच सचिन पडवळ, किरण तावडे, भारती पेडणेकर उपस्थित राहून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा गौरव केला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोसकर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, विश्वस्त मंगेश नागांवकर, तसेच सचिन फाळके, मयुर दिवेकर, मनिष साळकर, अनिल आगरे आणि सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वी झाले व स्थानिक समाजात रक्तदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या शिबिरामुळे फक्त रुग्णालयासाठी जीवनदान पुरवले गेले नाही, तर समाजात मानवतेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण झाली. बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे हे उपक्रम नेहमीच समाजस्नेही, प्रेरणादायी आणि उदात्त स्वरूपाचे असतात, अशी उपस्थितांनी मनःपूर्वक नोंद केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा