फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी साकारल्या सुंदर वेशभूषा!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये प्री प्रायमरी विभागासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये नर्सरी, ज्युनिअर व सीनियर केजी मधील बहुसंख्य मुले सहभागी झाली. फ्लॉवर या थीमवर नर्सरी मधील चिमुकल्या मुलांनी सुंदर वेशभूषा केली होती. यामध्ये चाफा, सूर्यफूल, जास्वंद इत्यादी फुलांच्या वेशभूषेत मुले सहभागी झाली तर कम्युनिटी हेल्पर या थीमवर ज्युनिअर केजीच्या मुलांनी भाजी विक्रेता , सैनिक, पोलीस, शिक्षक, सफाई कर्मचारी, शेफ, डॉक्टर , वाहतूक पोलीस, हवाई सुंदरी, शेतकरी इत्यादी समाजासाठी उपयोगी व्यक्तींची आकर्षक वेशभूषा साकारली तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या वस्तू या थीमवर सिनियर केजीच्या मुलांनी वर्तमानपत्र, मोबाईल , वॉशिंग मशीन, टूथपेस्ट , वॉटर , ट्रॅफिक सिग्नल इत्यादी वस्तूंची लक्षवेधक वेशभूषा साकारली.
या स्पर्धेसाठी श्रीम. पूजा सावंत यांनी परीक्षकाची भूमिका बजावली. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सहसंचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत व मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सिंड्रेला परेरा यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्री प्रायमरी विभागाच्या शिक्षिका सेलिन बर्नार्ड, सिंड्रेला परेरा, अनघा आयरे, सिद्रा शेख तसेच पालकांनी परिश्रम घेतले.
