You are currently viewing आंबोली सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात.

आंबोली सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात.

ब्रिगेडिअर सुधीर सावंत व मा. प्रशांत पानवेकर प्रांताधिकारी सावंतवाडी यांच्या हस्ते गुणनंत विद्यार्थी व कर्मचारी यांचा सत्कार व ‘वेध’ वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन

आंबोली

आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा १९ वा वर्धापन दिन दिनांक २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ मा. प्रशांत पानवेकर प्रांताधिकारी सावंतवाडी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाला. दि.२३ डिसें.२०२२ रोजी शाळेचे पेट्रॉन मा.ब्रिगेडिअर सुधीर सावंतसाहेब यांच्याप्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक व बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रशांत पानवेकर प्रांताधिकारी, सावंतवाडी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री सुरेश गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. विद्यार्थ्यांनी मुकनाटय, लावणी, देशभक्तीपरगीत सादर केले तसेच मराठी आणि हिंदी गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर केले. कॅडेट यश धुरी याच्या लावणी नृत्याने सर्वांची मने जिंकली. वर्षभरात जिल्हा व शालेय व विभाग स्तरावर क्रिडाप्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देवून प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये बेस्ट टिचर श्री ऋषिकेश गावडे, श्री भुषण पाटकर, श्री अरूण गावडे, श्री सतिश आईर, श्री रूपेश आईर यांचा सत्कार करण्यात आले. डॉ. चंद्रकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मागील दोन वर्षाच्या काळात कोविडसारखा आजार पसरत असताना संस्थेने सुयोग्य पध्दतीने शाळेच्या कामाचे नियोजन करून शैक्षणिक कामकाज केले व एकही कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना बाधित झाला नाही, याची खबरदारी घेतली. याबाबतीत संस्थेचे व मुलांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी २३ डिसें. २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ब्रिगेडियर सुधीर सावंत मा. श्री. पी.एफ. डॉन्टस व संचालक यांचे सैनिक स्कूलच्या आवारात आगमन झाले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रमुख पाहूण्यांना करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहूण्यांचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देवून उत्कृष्ट सैनिकी संचलन सादर केले. १२ वी घ्या विद्यार्थ्यांची पासिंग आउट परेड झाली. त्यानंतर छोट्या सैनिकांनी कराटे, मल्लखांब, लेझिम लाटीकाटी, व्हॅलीक्रॉसिंग व आबस्टॅकल्स इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली.

ब्रिगेडिअर सुधीर सावंत व गा.श्री. पी. एफ. डॉन्टस संस्था अध्यक्ष यांचे शाळेचे प्राचार्य सुरेश गावडे यांनी हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. शाळेचा वार्षिक विशेषांक ‘वेध’ थे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बेस्ट हाउस ऑफ द इयर म्हणून विशालगड हाउसची निवड करण्यात आली. तसेच बेस्ट कंडेट म्हणून कंडेट सुजल संतोष साटेलकर व बेस्ट स्पोर्टस्मन म्हणून कंडेट अभिषेक उदय पाटील याचा गौरव करण्यात आला.

यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतूक केले. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली ते निश्चितच कौतूकास पात्र आहेत. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशिक्षकांनी किती परिश्रम घेतले असतील याची प्रचीती येते. या शाळेने आपला विद्यार्थी सर्वगुणसंपन्न करण्याचा संकल्प केलेला आहे, असे दिसून येते. अल्पावधित या शाळेने उंच झेप घेतली आहे, याचा शाळेतील विद्यार्थी व पालकांना अभिमान असायला हवा. एन.डी.ए. परिक्षेत अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी संबंधित शिक्षक आणि पालकवर्ग या सर्वांचे योगदान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात सैनिक स्कूलचे संस्था अध्यक्ष मा. श्री. पी. एफ.डॉन्टस म्हणाले, जास्तीतजास्त मूलांचे भवितव्य घडविण्याचे महान कार्य या सैनिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहे याचा सार्थ अभिमान विद्यार्थी व पालकांना असायला हवा. १० वी १२ वी च्या शालान्त प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सैनिक स्कूलचा निकाल १०० उ लागतो. याचे श्रेय येथील सर्व शिक्षकांना जाते. या शाळेमधून देशसेवेसाठी मोठ्याप्रमाणात सैन्य अधिकारी होण्यासाठी एन.डी.ए परिक्षेत अधिकाधीक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळावेणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पाहिजेत.

आभार प्रदर्शन प्राचार्य सुरेश गावडे यांनी केलेल्या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा.श्री. पी. एफ. डॉन्टस सचिव श्री सुनिल राउळ उपाध्यक्ष श्री. दिनानाथ सावंत, संचालक श्री जॉय डान्टस, श्री शंकर गावडे, श्री शिवाजी परब, श्री विनायक शेणई, श्री राजाराम वळंजू, कार्यालयीन सचिव श्री दिपक राउळ, कर्नल विजय सावंत, कॅप्टन, डि. के. गोरे, श्रीम, चित्रा दिघे (अधिक्षक भ.नि.नि. वेतनपथक, माध्य. शिक्षण) सैनिक ना.पत. संस्थेचे चेअरमन श्री. शिवराम जोशी, संचालक श्री चंद्रकांत शिरसाट, श्री. बाबुराव कविटकर, सौ. ललिता भोळे, आंबोली सरपंच श्रीम. पालयेकर श्री विजय गावर पालक प्रतिनिधी श्रीम. समजिसकर श्रीम. गंधाली मुंडले श्रीम. आष्टेकर प्राचार्य गुरुदास कुसगावकर प्राचार्य प्रदिप शिंदे, श्री सरफदार श्री गोविंद गोयें श्री श्रीधर गावडे प्रमुख गावकर फकार श्री विजय राउत, श्री अनिल चव्हाण, सर्व शिक्षक, आंबोली ग्रामस्थ, पालक पंचकोशीतील आजीमाजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा