भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका परब यांची सुहास गवंडळकर यांना सदिच्छा भेट
वेंगुर्ला :
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
यावेळी वेंगुर्ला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सुहास गवंडळकर प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभास वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्वीकृत नगरसेवक प्रशांत आपटे, यशवंत उर्फ दाजी परब, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपनगराध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर विविध स्तरांतून गवंडळकर यांचे अभिनंदन होत असून, वेंगुर्ला शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
