You are currently viewing सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर

प्रेस क्लब भुषण लक्ष्मण आडाव जीवन गौरव सिताराम गावडे यांना तर प्रेस क्लब डिजीटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर यांना जाहीर

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे 2025-26 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार दैनिक.कोकणसाद चे सिंधुदुर्ग उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर, प्रेस क्लब ग्रामीण पत्रकार पुरस्कार सुनिल आचरेकर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार संदेश पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.तर या निमित्ताने प्रेस क्लब जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना जाहीर करण्यात आला आहेत.
हे पुरस्कार शुक्रवारी प्रेस क्लब च्या जिल्हा कार्यकर्णीतील निमंत्रित सदस्यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आले असून या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार आहेत.६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्या दिवशी पुरस्कारा बाबत चर्चा झाली.
यात दै.कोकणसाद चे उपसंपादक लक्ष्मण आडाव हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असून वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आपली पत्रकारिता करत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.सध्या ते उपसंपादक असून वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे.कोकण लाईव्ह ब्रेकिंग चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांना प्रेस क्लब कडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना दिलेला न्याय नेहमीच अन्याया विरोधात केलेला प्रतिकार यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तर कसाल येथील सुनिल गणपत आचरेकर यांना प्रेस क्लब कडून प्रेस क्लब चा ग्रामीण पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यानी पुढारी सारख्या वृत्तपत्रात तसेच सोशल मीडिया त ही कार्यरत आहेत.तर डिजिटल मिडीयात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शैलेश मयेकर यांना प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.ते गेली अनेक वर्ष सोशल मीडियात कार्यरत असून स्वता एक संपादक म्हणून ते आपला चॅनल चालवतात.कर्मचारी पुरस्कार लोकमत चे संदेश पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.ते गेली अनेक वर्ष लोकमत वृत्तपत्रात जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे असणार आहे. पुरस्काराची घोषणा जिल्हा कार्यकर्णी च्या निमंत्रित समितीकडून जाहीर करण्यात आली.
यावेळी प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष अनंत जाधव सचिव राकेश परब यांच्यासह सदस्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. दरम्यान जाहीर पुरस्कारांचे वितरण दिमाखदार सोहळ्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा