You are currently viewing एसटी कर्मचारी संप समन्वयातून सोडवावा

एसटी कर्मचारी संप समन्वयातून सोडवावा

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची शासनाकडे मागणी.

वैभववाडी

सध्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे विद्यार्थ्यां वर्ग व सर्वसामान्य प्रवासी ग्राहक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता एसटी कर्मचारी संघटना व शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा आणि सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री मा.अनिल परब यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. सदर मेलची प्रत मा.जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व मा.विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना पाठवली आहे.
एसटी ही ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थी व नागरिकांच्या हक्काचे आणि सुरक्षित साधन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावित आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये नुकतीच सुरू झाली आहेत. या संपामुळे विद्यार्थी बस सुविधेअभावी शिक्षणापासून वंचित राहतो आहे. ही बाब चिंतनीय असून एसटी संप कर्मचारी व शासन यांच्या ताठर भूमिकेमुळेच संप न मिटता अधिक चिघळण्यास दोघेही जबाबदार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होते आहे. या संपाचे राजकारण न होता एसटी कर्मचारी संघटना व शासन यांच्यामध्ये चर्चा होऊन समन्वयातून तडजोडीने योग्य मार्ग काढावा व सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंखे व संघटक श्री. जितेंद्र पिसे यांनी मेलद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =