You are currently viewing बांदा भाजपाच्या वतीने १६ जूनला ज्येष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम…

बांदा भाजपाच्या वतीने १६ जूनला ज्येष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम…

मोदी @9 अंतर्गत उपक्रम; उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांकडून आवाहन…

बांदा

मोदी @ 9 या कार्यक्रमाअंतर्गत बांदा मंडलाचा जेष्ठ नागरिकांबरोबर संवाद कार्यक्रम शुक्रवार १६ जून ला सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजापूर लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित राहणार आहेत. तरी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बांदा भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा