You are currently viewing तलवारबाजी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

तलवारबाजी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

तलवारबाजी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

कणकवली :

येथील विद्यामंदिर प्रशालेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलीच्या गट तर १९ खालील मुलाच्या गटात विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांची कोल्हापूर विभागीय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे..

१७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये सबुरी नानचे श्रृष्टी मोरये, कृपा शिरकर, भूमिका चेचरे, प्रज्योती जाधव या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये ऋतुराज होसुरकर, अथर्व तेली, प्रणव कुडाळकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये ऋग्वेद पिळणकर याने यश संपादन केले. त्यांना अच्युत वणवे व श्री पेडणेकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्याचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजय वळंजू व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पी. जे. कांबळे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =