You are currently viewing पंढरीनाथ तामोरे यांची घुमतोय वादळवारा, झंझावात, आदर्शाचे प्रकाशदिप ही पुस्तके सामाजिक आणि भौगोलिक माहिती देणारी – जेष्ठ संपादक दिनकर गांगल ‌‌

पंढरीनाथ तामोरे यांची घुमतोय वादळवारा, झंझावात, आदर्शाचे प्रकाशदिप ही पुस्तके सामाजिक आणि भौगोलिक माहिती देणारी – जेष्ठ संपादक दिनकर गांगल ‌‌

मुंबई :

सध्या आपल्या सर्वांच्या संवेदना हरविलेल्या आहेत, याही परिस्थितीत साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे यांची घुमतोय वादळवारा, झंझावात, आदर्शाचे प्रकाशदिप तीनही पुस्तके सामाजिक आणि भौगोलिक माहिती देणारी असून पुढील पिढ्याकरिता मार्गदर्शक असून ती बारकाईने वाचली गेल्यास लक्षात येईल असे जेष्ठ पत्रकार थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संपादक दिनकर गांगल यांनी रविवारी दि.२८ डिसेंबर रोजी दादर येथील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई ग्रंथ संग्रहालय येथे पुस्तक प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. सुरूवात सरस्वती पूजन जेष्ठ पत्रकार दिनकर गांगल, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री लेखिका मेघना साने, जेष्ठ पत्रकार रविप्रकाश कुळकर्णी, श्रीकांत आंब्रे, आजचा तटरक्षक संपादक प्रविण ना. दवणे, सौ. नलिनी तामोरे याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. जेष्ठ संपादक दिनकर गांगल पुढे म्हणाले की,अरूण पेदे वेसावकर यांच्यासह कोळी आविष्कार जीवन चित्रण आज प्रत्यक्ष पाहत असताना यामध्ये खऱ्याअर्थाने चैतन्याचा खजिना सोबत आज प्रकाशित झालेल्या पुस्तका इतकाच असून यातून लालित्य पूर्ण समाज संस्कृती निर्माण करण्यात आल्याचे श्री. गांगल यांनी नमूद केले. जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले की, पंढरीनाथ तामोरे म्हणजे समाजाला दिशा देणारा आणि समाजाबद्दल जाणीव असणारा लेखक असल्याने त्यांची प्रमाण भाषा असून ती कोळी समाजाला आपली भाषा असल्याचे अधोरेखित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला असताना एकाच वेळी तीन पुस्तके प्रकाशित होणे हीच तामोरे याच्या लिखाणातील ताकद असल्याचे विषद केले. यावेळी अभिनेत्री लेखिका मेघना साने यांनी एका पुस्तकाचे परिक्षण करुन इतर पुस्तके सुध्दा तेवढ्याच ताकदीची वाचनीय असल्याचे सांगितले. जेष्ठ पत्रकार रविप्रकाश कुळकर्णी, श्रीकांत आंब्रे, आजचा तटरक्षक संपादक प्रविण ना दवणे, सौ. प्रज्ञा तामोरे आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी प्रास्ताविक राजेंद्र मेहेर माजी सरचिटणीस अखिल भारतीय मांगेला समाज परिषद यांनी केले. नुत्य कलाकार अरूण पेदे वेसावकर यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार लेखक पंढरीनाथ तामोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प करंडक प्रदान करून करण्यात आला. प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन भक्तीसंगम मासिकाचे कार्यकारी संपादक प्रा. हेमंत सामंत आणि दर्याचा राजा सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी संयुक्तपणे अतिशय सुबक शब्दात केले. तर श्रीमती सुजाता एकनाथ पागधरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा