You are currently viewing सर्वोच्च ‘साल्हेर’ किल्ल्याच्या शिखरावर ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील बारा किल्ले’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

सर्वोच्च ‘साल्हेर’ किल्ल्याच्या शिखरावर ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील बारा किल्ले’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

*सर्वोच्च ‘साल्हेर’ किल्ल्याच्या शिखरावर ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील बारा किल्ले’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण*

पिंपरी
महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला ‘साल्हेर’च्या सर्वोच्च शिखरावर ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘युनेस्कोच्या वारसा यादीतील छत्रपती शिवाजीमहाराजांचे बारा किल्ले’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. याप्रसंगी दुर्गप्रेमी प्रा. डॉ. अमित तापकीर, गिर्यारोहक प्रदीप डोंगरे, हर्ष बोऱ्हाडे, युवराज गवळी आणि अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संवेदना प्रकाशनामार्फत प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात युनेस्को वारसा यादीतील बारा किल्ल्यांची विस्तृत माहिती व संक्षिप्त इतिहास लिहिण्यात आला आहे. अरुण बोऱ्हाडे हे इतिहासाचे अभ्यासक आणि गिर्यारोहक असून सह्याद्रीतील अनेक शिखरे व घाटवाटा त्यांनी पादाक्रांत केले आहेत. महाराष्ट्रातील सुमारे सव्वादोनशे गडकिल्ल्यांना त्यांनी अभ्यासपूर्ण भेटी दिल्या आहेत. मागील वर्षी त्यांचे ‘जिंजी, वेल्लोर आणि तंजावर’ हे दुर्गभटकंतीवरील पुस्तक प्रकाशित झाले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा