You are currently viewing प्रथमेश सुतार नावाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानं लॉकडाऊनच्या काळात   बनवली एक इलेक्ट्रिकल बाईक

प्रथमेश सुतार नावाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानं लॉकडाऊनच्या काळात बनवली एक इलेक्ट्रिकल बाईक

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपली कामं आटपली. अनेकजण खूप वर्षांपासून आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नव्हते. त्यांनीही या काळात आपल्या घरची वाट धरली आणि कुटुंबियांसह वेळ घालवला. तर काही लोकांनी आपल्या फिटनेसवर लक्ष दिले. तर अनेकांनी जुगाड करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या काळात घरगुती जुगाडाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज अशाच एका यशस्वी जुगाडाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

प्रथमेश सुतार नावाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानं लॉकडाऊनच्या काळात एक इलेक्ट्रिकल बाईक बनवली आहे. हा विद्यार्थी कर्नाटकचा रहिवासी आहे.

सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अशात आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाकाळात या तरूणानं स्वतः एक बाईक तयार केली. ही बाईक तयार करण्यासाठी भंगारातील सामानाचा वापर करण्यात आला .

 

या बाईकला एकदा चार्जिंग करावी लागते

 

प्रथमेशनं दिलेल्या माहितीनुसार या बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर ती ४० किलोमीटर चालू शकते. प्रथमेशचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. आपल्या मुलानं इलेक्ट्रिक बाईक तयार केल्यामुळे ते खूपच आनंदी झाले आहेत. प्रथमेशनं सगळ सामान आपल्या वडिलांकडून घेतलं होतं. याच सामानानं त्याने नवीन कोरी बाईक तयार केली आहे. त्यांनी बाईकसाठी एसिड बॅटरी विकत घेतली होती.

माध्यमांशी बोलताना त्यानं सांगितलं की, ”आज पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत. लॉकडाऊनमध्ये जेव्हा शाळा बंद झाल्या तेव्हा मी वेगळं काहीतरी करण्याचा विचार केला. मी माझ्या वडिलांच्या मदतीने ही बाईक तयार केली. ”

त्यांनी पुढे सांगितले की, ”एकदा चार्जिंग केल्यानंतर ही बाईक ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या बाईकची स्पीड ४० किलोमीटर इतकी आहे. इतकंच नाही तर या बाईकमध्ये रिवर्स गिएअर सुद्धा आहेत. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार , ” मी खूप आनंदी आहे. माझ्या मुलानं मोकळ्या वेळाचा चांगला फायदा करून घेतला म्हणून मला खूप चांगले वाटते. मी एक इलेक्ट्रिशयन असून मला बॅटरी बनवण्याचे जास्त ज्ञान नाही. पण माझा मुलगा एकेदिवशी खूप चांगले काम करेल आणि त्याच्यावर मला खूप गर्व आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा