*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अखेर गाठलास तू सूर्याला*
अखेर गाठलास तू सूर्याला
प्रकाश देतो तो बारा तास
कसल्याच नसतात मागण्या
देतही नाही अजिबात त्रास
//1//
नाही लागत गणवेश त्याला
करत नाही तो मागणी अधिक
चामडी जाळतो महिने चार
थोडा आगाऊ आहे “अधीक”
//2//
हजर राहून *वेळेवरती*
नाही चुकवत काम कधी
तापला जरी कमी अधीक
पसरवत नाही तो *व्याधी*
//3//
असला जरी तो धास्तावलेला
ऐकून बातमी *प्रती सूर्याची*
चायनावर आहे त्याचा *राग*
घेऊ नका कुणी फिरकी त्याची
//4//
आला उन्हाळा तब्येत सांभाळा
त्यालालाही पाजा थंड सरबत
उतणार नाही *मातणार नाही*
नका ठेवू कुणी त्याला *टुकत*
//5//
असून एकला तो *दिनमणी*
घ्यावे आपण समजून *त्याला*
आपलीच आहेस म्हणून सांगतो
केलीय सुरवात दुसरा करायला
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
