You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने यांच शुक्रवार दिनांक 26/12/2025 रोजी अणसूर पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये अणसूर गावचे गावचे सरपंच श्री. सत्यविजय गावडे सर, उपसरपंच वैभवी मालवणकर,अणसूर सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे,साक्षी गावडे,वामन गावडे,पाल सरपंच कावेरी गावडे तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रणाली दळवी,ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने दीपप्रज्वलन करून लुई ब्रेल व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच अणसूर गावचे सरपंच सत्यविजय गावडे सर यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. पाल सरपंच कावेरी गावडे यांनी देखील दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे सर यांचा अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या मेळाव्यामध्ये १० दिव्यांग बांधवांना घरघंटी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. ३ दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली.तसेच साईकृपा संस्थेच्या वतीने लवू तुकाराम पालकर व भूषण गावडे यांना कानाची मशीन देण्यात आली.हा मेळावा अणसूर पूर्ण प्राथमिक शाळा वरचे येथे घेण्यात आला. त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.या मेळाव्याला ५०हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने उपहाराची व्यवस्था केली.सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा