You are currently viewing कोमसाप मालवण आयोजित करुळचा मुलगा पुस्तक परिचय स्पर्धा रसिका तेंडोलकर प्रथम, वंदना राणे द्वितीय तर रश्मी आंगणे तृतीय 

कोमसाप मालवण आयोजित करुळचा मुलगा पुस्तक परिचय स्पर्धा रसिका तेंडोलकर प्रथम, वंदना राणे द्वितीय तर रश्मी आंगणे तृतीय 

मालवण :

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने अलिकडेच कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या *करूळचा मुलगा* या आत्मचरित्रावर आधारित परिचय लेख स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ सुरेश गावकर ज्येष्ठ कोमसाप कार्यकर्ते आचरा मालवण यांच्या अध्यक्षतेखाली बिडये विद्यामंदिर केंद्र शाळा आचरे नं.१ येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेचे परीक्षण सुधाकर वळंजू (पणदूर) यांनी केले होते. परीक्षकांच्या निर्णयानुसार निकाल पुढीलप्रमाणे -प्रथम रसिका राजेंद्र तेंडोलकर ( कसाल ),द्वितीय- वंदना नारायण राणे ( कणकवली), तृतीय -रश्मी रामचंद्र आंगणे (ओसरगाव) ,उत्तेजनार्थ- श्रद्धा वाळके(मसुरे), महादेव बागडे (आचरा )मोहन गावकर (कोल्हापूर) , मधुरा माणगावकर (कणकवली), उज्ज्वला धानजी (कणकवली ),चंद्रशेखर धानजी (कणकवली) ,शरयू घाडी (मुणगे- देवगड )

सदर स्पर्धा कोमसाप मालवणच्या सक्रिय कार्यकर्त्या सुजाता सुनील टिकले कणकवली यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. विजया भास्कर वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेली होती .सहभागी स्वराशा कासले, आत्माराम नाटेकर, योगेश मुणगेकर, पूर्वा खाडिलकर, तेजल ताम्हणकर,अशोक आठलेकर, आदिती मसूरकर, वैजयंती करंदीकर, दिव्या परब, दिपाली कांदळगावकर, सुगंधा गुरव, देवयानी आजगावकर, ऋतुजा केळकर यांनाही सुजाता टिकले कणकवली यांनी अरण्यॠषी मारुती चितमपल्ली यांचा *रानवाटा* हा ग्रंथ प्रदान केला.

विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून आलेला त्यांची स्वाक्षरी असलेला त्यांचाच *स्मृतिजागर* हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर *सुरेश* *ठाकूर, सुधाकर वळंजू,अशोक* *कांबळी,* *सदानंद कांबळी, स्नेहा* *नारिंगणेकर, कुमार कांबळे* , *माधव गावकर* हे मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले अजूनपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ९९ अध्यक्ष झाले परंतु मधुभाई ह्या एकमेव अध्यक्षाने आपल्या कोकणच्या लाल मातीतील साहित्यिकांसाठी कोमसाप निर्माण केली. हे फार मोठे कार्य आपणासाठी केले आहे. म्हणूनच त्यांचे चरित्र मी परिचय लेख स्पर्धेला घेतले. आलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मीही भारावून गेलो. कोमसाप मालवणच्या सर्व लेखकांनी लेखनशैलीबरोबरच आपली वाचनसंस्कृती अशीच वाढवणे आवश्यक आहे .अध्यक्ष स्थानावरून सुरेश गावकर म्हणाले मालवण कोमसापने गेल्या सहा वर्षात उत्तुंग साहित्यिक कार्य केले आहे. सिंधू साहित्य सरिता (चरित्र )ये गं ये गं सरी ( कविता) आणि बीज अंकुरे अंकुरे (ललित )अशी पुस्तके प्रकाशित करून लिहित्या हातांना उभारी दिली आहे. यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त रसिका तेंडोलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो,कवयित्री सुनंदा कांबळे, द.शि. हिर्लेकर गुरुजी ,बाबाजी भिसळे,प्रकाश पेडणेकर ,मंदार सांबारी आदींसोबत कोमसाप मालवणचा बहुसंख्य रसिक परिवार उपस्थित होता. विठ्ठल लाकम (डोंबिवली ) शरयू घाडी (ठाणे) पासून त्रिंबक आजगावकर (वेंगुर्ला) गोविंद प्रभू ( सावंतवाडी) पर्यंत बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरयू कांदळगावकर यांनी पद्मश्री मधुभाई व सुरेश ठाकूर उभयतांचे सुंदर छायाचित्र सुरेश ठाकूर यांना आदरपूर्वक भेट दिले. या कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप मालवणच्या कार्यकारी मंडळाने केले होते. अध्यक्ष सुरेश गावकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा