You are currently viewing “गड आला पण सिंह गेला” बबन साळगावकर निवडून आले पाहिजे होते अशी शहरात चर्चा.

“गड आला पण सिंह गेला” बबन साळगावकर निवडून आले पाहिजे होते अशी शहरात चर्चा.

“गड आला पण सिंह गेला” बबन साळगावकर निवडून आले पाहिजे होते अशी शहरात चर्चा.

सावंतवाडी

स्वच्छ कॅरेक्टर,निस्वार्थी वृत्ती व प्रशासकाचा अभ्यास असलेला एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून आजही या शहरांमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे पाहिल जात.
39 वर्ष राजकारणात असून 23 वर्ष नगरसेवक त्यानंतर आठ वर्ष त्यांनी नगराध्यक्ष पद प्रामाणिकपणे भूषविल शून्य भ्रष्टाचार व कर्जमुक्त नगरपरिषद करून स्वच्छ-सुंदर सावंतवाडी अशी या शहराची ओळख करून दिली परंतु त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाला काही शहरातील नागरिकांनी शेवटपर्यंतर क्षमा केली नाही परंतु ज्यांनी याचं संधीचा फायदा घेऊन नगराध्यक्ष झाल्या झाल्या धुमशानी कारभाराने कर्जमुक्त नगरपरिषद कर्जबाजारी करून गोरगरीब व्यापाऱ्यांना अक्षरशा छळलं त्यांचे व्यवसाय उध्वस्त केले अशा माणसाला मात्र येथील काही नागरिकांनी कसलाही विचार न करता क्षमा करून त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आणि इथेच खऱ्या अर्थाने माणुसकी आणि विश्वास हरला.
. परंतु झिरंग येथील नागरिकांनी आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव व उबाठा गटाच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिला समीरा खलील भले 18 मताने पडली तरी तेथील नागरिकांनी निस्वार्थ पणे तुमच्या साठी 446 चं मतदान करून माणुसकीचे दर्शन घडवलं. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व उबाठा गटाचे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील शेखर सुभेदाराला आपल्याच काही माणसांनी दगा दिला. ही दोन्ही माणसं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान मध्ये अहोरात्र लोकांच्या सेवेमध्ये अग्रेसर असतात. काही लोक त्यावेळी त्यांच्याकडून आपली काम करून घेतात व त्यांच्या वेळेला मात्र अशा पद्धतीने पाठ फिरवतात तेव्हा येथे हि सामाजिक बांधिलकी पूर्णपणे हरते.

प्रतिक्रिया व्यक्त करा