You are currently viewing दर्शवेळा अमावस्या

दर्शवेळा अमावस्या

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दर्शवेळा अमावस्या*

 

दर्शवेळा अमावस्या सण हा काळोखातला,

निसर्गाच्या कुशीतला नवा आनंद फुलला..

 

वनराई हसतच गंध दरवळ देते,

मातीच्याही ओलाव्यात मनी पुन्हा बाल्य येते..

 

चुलीवरची भाकरी,वर वरणाची धार,

पानाफुलांत मिसळे हास्य,विनोद अपार..

 

मित्रांच्याही गप्पांमध्ये दिन सारा हरवतो,

वनभोजनाने सारा मैत्र संसार रंगतो..

 

झाडाझुडपात खेळ काळजीला विसरते,

जीवनाची खरी धार हसण्यात उमटते..

 

अमावस्येच्या रात्रीही तारे होतात सोबती,

चंद्र नसला तरीही उजळती आशाज्योती..

 

आगीभोवती बसता नाते अंतरी जुळते,

अंधारात उमलून विश्वासपाकळी होते..

 

पाखरांचा कलरव मंद तालात चालतो,

मनी साठवून घेत शांततेचा काळ जातो..

 

जरा विसाव्याचा काळ धावपळीला मिळतो,

साधेपणाचीच शाळा दर्शवेळा शिकवतो..

 

परतून येतानाही ओढ निसर्गी लागते,

सय मनात जपून गोड हसरीशी होते..

 

अमावस्या जरी काळी गोड अनुभव देते,

वनभोजन रंगत मोड जीवनाला येते..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा