You are currently viewing और एक पेग

और एक पेग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*और एक पेग*

 

वाचणारांनाही चढते कविता

करती तोंड आंबट

घाला जरा थोडा सोडा

चकणा भजी तेलकट

घ्यावे जरा दमा दमाने

नाही ज्याला सवय

चोरून पिणाराने नंतर

खावे थोडे *गोमय*

पिणारांची संख्या वाढो

तिजोरीत वाढेल महसूल

चिंता नको चढण्याची नशा

झालाय तो *मलूल*

एक घोट पुरतो हल्ली

पडते *विकेट* सत्वर

पहा “तमाशा” नंतरचा

मारतो चौका आणि सिक्सर

आहे खिलाडी कसलेला

पडते विकेट *लवकर*

भांडून बायको संगे

पितो तो *चिक्कार*

नाही समजत थांबायचे

कुठे आणि केंव्हा

ऑफिसात कारकून सारे

करतात *हेवा*

गेल्या बागा झोपून

वाट लागली द्राक्षांची

कशी होणार ख्रिसमस पार्टी

हीच काळजी *बेवड्यांची*

 

विनायक जोशी 🖋️ठाणै

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा