सावंतवाडी:
शहरातील रहिवासी, उभाबाजार येथील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर (वय ६३) रा. माठेवाडा, सावंतवाडी यांचे बुधवारी पहाटे कोल्हापूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने उभा बाजार येथील सुवर्ण व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. आज सायंकाळी उपरलकर स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन बहिणी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. उभा बाजार येथील सुवर्णकार आणि भाजपचे पदाधिकारी संजू उर्फ दत्ताराम शिरोडकर यांचे ते बंधू होत.
