You are currently viewing गोवा म्हापसा येथे शिवसेनेच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवा म्हापसा येथे शिवसेनेच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज म्हापसा येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना नेते,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत,प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर, आमदार सुनील प्रभू,माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी,आमदार रमेश कोरगावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर , युवासेना सचिव सूरज चव्हाण,मुंबई नगरसेवक उदेश बांदेकर, संजय पडते, संदेश पारकर, आदिंसह उमेदवार ,गोवा व सिंधुदुर्ग येथील स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा