You are currently viewing आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांची हकालपट्टी करण्याची महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता धनंजय जुन्नरकर ह्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे मागणी!

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांची हकालपट्टी करण्याची महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता धनंजय जुन्नरकर ह्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे मागणी!

मुंबई- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत ह्यांच्याच जिल्हयात आदिवासी मुलीवर बलात्कार होऊन तीची हत्या केली जाते, तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरून दिड महिना तिची आई मुलीच्या मृतदेहापाशी न्यायाच्या अपेक्षेने बसून राहाते हे पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारे आहे.

आदीवासी विकासमंत्र्यांना
दिड महिना झाला तरी या गोष्टीचा पत्ता नाही. अशा संवेदनाहीन मंत्र्याची महाराष्ट्राला गरज नाही त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे केली आहे.
नंदुरबार जिल्यातील पिडीत आदिवासी
मुलीचे शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी,
” पोलीसांनी सांगीतले नाही म्हणून बलात्काराच्या अनुषंगाने विच्छेदन केले नाही,” अशी माहिती ध्वनीफीतीत मिळाल्याचे वाचनात आले आहे.

पोलीसांनी एकदा मृतदेह डॉक्टरांच्या ताब्यात दिल्यावर त्यांनी स्वतः च्या बुद्धीने काम करायचे आहे.
एखादया सांगकाम्या प्रमाणे काम केल्यास मृतांना कधी न्याय मिळणार? असा संतप्त सवाल धनंजय जुन्नरकर ह्यांनी उपस्थीत केला आहे

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात 12 ऑगस्टला गर्भवती महिलेला आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बालकांचा डोळ्यांदेखत मृत्यू झाला.

नाशीक मध्ये पैशांसाठी ओदीवासी पालक पोटची मुले विकत आहेत.

याचिकाकर्ते डॉ. राजेंद्र बर्मा यांच्या वतीने ज्येष्ठ वकील जे.जे. टी. गिल्डा ह्यांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे
15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत मेळघाटात 18 मुलांचा मृत्यू झाला. त्या भागात स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, डॉक्टर कित्येक महिने कामावरच येत नाहीत, ही स्थानिकांची तक्रार आहे.

जुलै महिन्यात राज्यात “शून्य” ते “5 ” वयोगटातील 1063 बालमृत्यूची नोंद झालेली आहे पैकी 179 आदीवासी बालके आहेत.
आदीवासी मंत्र्यांचे कोठेही लक्ष व प्रशासनावर वचक दिसून येत नाही.

शवविच्छेदन करणारा डॉक्टर, स्थानीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,चौकशी अधिकारी ह्या सर्वांवर देखील कडक कारवाई करून यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्रांकड मागणी केलेली आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष चालू असून एक आदिवासी महीला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान आहे.
1995 मे 2014 व 2022 इतका काळ

विजयकुमार गावीत मंत्रीपदावर आहे. अनुभवी मंत्री असतानाही वारंवार दुर्लक्ष, कामाचे गांभीर्य नाही महिलांच्या
व मुलांच्या जीवाची त्यांना परवा वाटत नसेल तर महाराष्ट्राला अशा मंत्र्यांची देखील गरज नाही त्यांचा राजीनामा घेण्यात यावी किंवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी धनंजय जुन्नरकर ह्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − three =