भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे रुग्णांसाठी वैद्यकीय साहित्य व फळांचे वाटप
वेंगुर्ले
भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले येथे रुग्णालयास अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. यासोबतच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला व पुरुष रुग्णांना फळांचे वाटपही करण्यात आले.
या उपक्रमावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हासदस्य अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, तसेच वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. शुभंम धारगळकर, डॉ. स्वप्नाली माने-पवार, डॉ. अमोल गबाळे यांच्यासह इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय महिला मोर्चा व भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदवला. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा सरचिटणीस रसिका मठकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सरचिटणीस प्रार्थना हळदणकर, अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेग मकानदार, आकांक्षा परब, परीचारीका पी. एफ. डिसोजा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या उपक्रमास माजी नगरसेवक व पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावून उपक्रमाचे स्वागत केले.
रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांनी या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले.
