ढेरी
नवऱ्याची ढेरी वाढण्यात
बायकोचाच असतो हात
तीच म्हणते थोडाच उरलाय
घेऊन टाका भात 😀😜
पिठलं उरो , पोळी उरो
बायकोच आग्रह करते
पुरणाच्या पोळीवर
तुपाची धार धरते 😝
बोन्ड वाढते , भजे वाढते
मस्त भाज्या करते
दोन्ही वेळेस यांचे पोट
तडस लागेपर्यंत भरते 😝
अन्न पूर्णब्रह्म म्हणून
तो ही खात राहतो
बायकोचं मन मोडत नाही
म्हणून जाड होतो 😜
ज्याची बायको सुगरण असते
त्यालाच ढेरी येते
लोकं उगीच नावं ठेवतात
लक्ष द्यायचे नसते ? 😜
साधी फोडणी दिली तरी
जिचा स्वयंपाक खमंग होतो
त्याच बाईच्या नशिबात
ढेरीवाला नवरा असतो 😛
जिथं जाईल तिथं लोकं
आग्रह करत राहतात
स्वभाव , हुशारी सोडून
ढेरी कडेच पाहतात 😀
बरेचजण सल्ला देतात
थोडा व्यायाम करत जा
सकाळी उठून थोडं तरी
ग्राऊंडवर पळत जा 😏😀
योगासनं , प्राणायाम
का करत नाही ?
पहाटे उठून डोंगरावर
का चढत नाही ? 😀
ते जरी बोलले तरी
कशाला लक्ष द्यायचं
एक वाटी संपली की
दुसरं आईस्क्रीम घ्यायचं 🤪
लोकांच्या भरीस पडून
काहीच करायचं नाही
उगीचच डायटिंग करून
मरकुडं व्हायचं नाही 😝
व्यायाम करा व्यायाम करा
ते म्हणतच असतात
कोण म्हणतं जाड माणसं
हँडसम दिसत नसतात 🤪😜
माकड हाड मोडल्यावर
कोण मदतीस येतो?
म्हणून मी पळत नाही
घरीच लोळत असतो 😝
फुकटचे सल्ले द्यायला
लोकांचं काय जातं
आमची ढेरी पाहून त्यांच्या
पोटात दुखत राहतं 🤪😜
वा वा छान म्हणून
जो जेवत असतो
खरं सांगतो त्याचाच पोटाचा
घेर वाढत असतो 😀
*कोण्याही ऐऱ्यागैऱ्याला*
*ढेरी सुटत नसते*
*ढेरीसाठी भगवंताची*
*कृपा लागत असते* 😜
.
*समाधानी माणसालाच*
*सुटत असते ढेरी*
*सुखाचे , आनंदाचे*
*प्रतीक असते ढेरी* 😀😝
👍👍👍👍👍👍
.
*वाढत्या पोटाला सगळेच नावे ठेवतात..*
*पण लोकांना काय माहिती,*
*ढेरीने, मोबाईल ची स्क्रिन*
*किती छान पुसता येते*
*संग्रह ©अजित नाडकर्णी,सविद मिडीया*
😜😂🤣
