You are currently viewing राष्ट्रीय सण देशाचा

राष्ट्रीय सण देशाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राष्ट्रीय सण देशाचा*

_____________________

 

भारताची शान आहे,

सन्मान तिरंगा प्यारा,

एकात्मतेचे तो प्रतीक,

रंग आहे त्याचा न्यारा ||१||

 

त्याग, शांतता, सुंदरता,

तीन रंगी शोभे समानता,

अशोक चक्र देई सन्मान,

शहीद वीरांची अमरता ||२||

 

शुरवीरांच्या बलिदानाचा,

रंग केशरी अभिमानाचा,

रंग श्वेत संदेश शांतीचा,

रंग हिरवा आनंदाचा ||३||

 

एकात्मतेचे हे प्रतीक,

राष्ट्रीय तिरंगा ध्वज,

१५ ऑगस्ट मंगल दिनी,

गगनी फडफडे आज ||४||

 

अमृत महोत्सवी वर्ष,

भारतीय स्वातंत्र्याचा,

साजरा करुया आज,

राष्ट्रीय सण देशाचा ||५||

 

कवी प्रविण खोलंबे.

मुरबाड,जि.ठाणे.

संपर्क – ८३२९१६४९६१

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 13 =