You are currently viewing देवगड तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा – गोठा, घरांची पडवी व माड कोसळून ५३,९०० रुपयांचे नुकसान

देवगड तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा – गोठा, घरांची पडवी व माड कोसळून ५३,९०० रुपयांचे नुकसान

देवगड तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा – गोठा, घरांची पडवी व माड कोसळून ५३,९०० रुपयांचे नुकसान

देवगड
देवगड तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गावोगावी अडथळे निर्माण केले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली, तरी काही भागांत नुकसानग्रस्त परिस्थिती आहे.

या अतिवृष्टीमुळे तालुक्यात एकूण ५३,९०० रुपयांचे नुकसान झाले असून आतापर्यंत २६०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ८० मि.मी. पाऊस झाला आहे.

वाडा गावातील श्री. विजय दत्ताराम वाडेकर यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळून अंदाजे १३,९०० रुपयांचे नुकसान झाले. शिरगाव येथील श्री. संजय शिवराम चौकेकर यांच्या घराची पडवी कोसळून अंदाजे २५,००० रुपयांचे नुकसान झाले. हिंदळे येथे कमलाकर महादेव मयेकर यांच्या घराच्या पडवीवर नारळाचा माड पडल्यामुळे अंदाजे १५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यात आज दुपारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा