You are currently viewing सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपकडून भरघोस निधी – राजन तेली

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपकडून भरघोस निधी – राजन तेली

मल्टीस्पेशलिस्टची जागा सर्वानुमते ठरवून निर्णय घ्या;..

सावंतवाडी

ऐतिहासिक शहर हे अधिक सुंदर दिसावे याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकचा निधी आणण्यासाठी भाजप म्हणून आमचा प्रयत्न आहे. 7 कोटी 34 लाखांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.दरम्यान मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल संदर्भात सर्वपक्षीय लोकांशी चर्चा करून योग्य जागेची निवड करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ते सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तेली पुढे बोलताना म्हणाले की नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडी शहरात रोपवे आणण्यासाठी आमचे प्रयत्न असून असे दोन मार्ग व्हावेत असा आमचा प्रस्ताव आहे, तर मोती तलावात फाउंटन बसवण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल अशी माहिती तेली यांनी यावेळी दिली.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर,माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक राजू बेग,माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी विनोद सावंत, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 5 =