मुंबई :
सुपरिचित लेखिका / कवयित्री शैलजा करोडे यांना ‘अर्धांगिनी एक पूर्णत्व फाऊंडेशन’ तर्फे शिवाजी नाट्य मंदिर दादर मुंबई येथे ‘सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. समाजकार्य व साहित्य क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
शैलजा करोडे यांना यापुर्वीही, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार तसेच बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
