भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीवर आमदार नितेश राणेंकडून कौतुकाची थाप

भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीवर आमदार नितेश राणेंकडून कौतुकाची थाप

कणकवली :

 

शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आज आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन हा बहाद्दर भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

राम जन्मभूमी ट्रस्ट वर बिनबुडाचे आरोप करून हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपा युवा मोर्चा ने थेट शिवसेना भवन वर धडक देऊन आंदोलन केले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती.

 

मागे न हटता भिडणाऱ्या भाजपा युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा