*वैभववाडी तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार*
स्वातंत्र्य दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात देशभक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील माजी सैनिकांचा महाविद्यालयाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. प्रथम एनसीसी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर ऑपरेशन सिंदुर, कमांडो ड्रिल डेमो तसेच देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे होते. यावेळी विश्वस्त शरदचंद्र रावराणे, वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे, उद्योजक श्री. गिरीधर रावराणे, माजी उपनगराध्यक्ष श्री.संजय सावंत, माजी बाल कल्याण सभापती सौ. स्नेहलता चोरगे व प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक विलास देसाई (एडगाव), सुनील संभाजी गायकवाड (कोकीसरे), सदानंद शंकर सावंत (नाधवडे – सरदारवाडी), राजेंद्र चरापले (वैभववाडी), संतोष कांबळे व विश्वनाथ पडवळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
माजी सैनिकांनी आपल्या अनुभवांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत भारतीय सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “भारतीय सैन्य जीवनात अनुशासन, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी सर्वोत्तम संधी देते. हे गुण विद्यार्थ्यांना सक्षम, जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिक घडविण्यास मदत करतात.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. ज्ञानेश्वर शिरसट यांनी व्यक्त केले.
