शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश
दोडामार्ग
शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश, आठवी व पाचवीचे ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ या परीक्षांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता आठवीतील कुमार क्षितीज कृष्णा नाईक २१२ गुण, शहरी सर्वसाधारण १७ वा, कुमार ओम संदीप गवस १८८ गुण, शहरी सर्वसाधारण ४७ वा, तसेच इयत्ता पाचवीतील कुमारी युगंधरा हिराकांत खानोलकर २०४ गुण शहरी सर्वसाधारण ३६ वी, कुमार गौरांग साईनाथ कुंदेकर २०० गुण, शहरी सर्वसाधारण ४३ वा, हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विकास भाई सावंत, उपाध्यक्ष डॉ डी. बी. नागवेकर, खजिनदार सी एल नाईक, सचिव व्ही बी नाईक, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी, दोडामार्ग गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, मुख्याध्यापक प्रल्हाद सावंत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ सदस्य व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बामणीकर, सौ. नाईक, राऊळ व उराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
