You are currently viewing चौकूळ येथे माकडाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

चौकूळ येथे माकडाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी…

आंबोली

चौकुळ-मधलीवाडी येथे एका महिलेवर माकडाने हल्ला केला आहे.यात तिच्या डोक्यावरील केसाचा पुंजका ओढून काढल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार आज सकाळी त्यांच्या घरासमोरील विहीरीवर कपडे धुत असताना घडला. तिला अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परिसरात फिरणार्‍या माकडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =