You are currently viewing राष्ट्रीय आदर्श समाजसेवक पुरस्कार महेश पांचाळ यांना प्रदान

राष्ट्रीय आदर्श समाजसेवक पुरस्कार महेश पांचाळ यांना प्रदान

गोवा :

 

समाज सेवा कामाची दखल घेऊन दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून निवड करण्यात आलेल्या सावंतवाडीतील युवा कार्यकर्ते महेश पांचाळ यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. इंटिग्रेटेड सोशल सोसायटी बेळगावी या संस्थेच्या माध्यमातून महेश पांचाळ यांना हा आदर्श समाज सेवक पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा