आमदार नितेश राणे यांनी दिली वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला वातानुकूलित रुग्णवाहिका

आमदार नितेश राणे यांनी दिली वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला वातानुकूलित रुग्णवाहिका

वैभववाडीवासियांनी लाडक्या नेत्याचे मानले आभार

वैभववाडी
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला वातानुकूलित रुग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेच्या चाव्या आ. नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. यावेळी वैभववाडी वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे व पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेतून रुग्णवाहिकेची होत असलेली प्रमुख मागणी लाडक्या नेत्याने पूर्ण केल्याने वैभववाडीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. वयोवृद्ध रुग्ण, गरोदर माता तसेच अपघातातील जखमी यांना पुढील उपचारासाठी सातत्याने वैभववाडीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय, ओरोस जिल्हा रुग्णालय किंवा कोल्हापूर येथील सीपीआर या ठिकाणी हलवावे लागते. कार्यरत असलेल्या 108 रुग्णवाहिकेत बिघाड झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी वाहन शोधावे लागते. वेळेत वाहन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची दाट भिती असते. ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका पुरवा अशी मागणी नागरिकांतून होत होती. आमदार नितेश राणे यांनी जनतेची मागणी कर्तव्य भावनेतून पूर्ण केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा