*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अजून नाही*
——————–
रस्त्यावरती हिरवळ दिसता, अजून वळते मान
कशास तुम्ही म्हणता सारे झालो पिकले पान
कळ्या फुलांचे नाजूक दर्शन
मनास देते ओढ
दवबिंदूचा थेंब टपोरा
अजून वाटे गोड
पहिल्या पावसा सरी बरोबर, अजून सुटते भान
कशास तुम्ही म्हणता सारे, झालो पिकले पान
अंधुक झाली नजर तरीही
मनात स्वप्ने मोठी
हिमालयाची उंची थोडी
अजून वाटते छोटी
जिद्द, चिकाटी, मेहनतीची बिरूदे मजला छान
कशास तुम्ही म्हणता सारे, झालो पिकले पान
किती उन्हाळे आले, गेले
मनात जपली हिरवळ
सार्यांना मग देत राहिलो
रसिक मनाचा दरवळ
कविते सोबत गात राहिलो ,आयुष्याचे गान
कशास तुम्ही म्हणता सारे, झालो पिकले पान
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
