You are currently viewing बदलते दिवस

बदलते दिवस

क्षणाक्षणाची काळजी होती,
आज दिवसांवर दिवस
वाया जात आहेत..

नात्यांनी नाती जोडत होतो,
आज नात्यांपासून लोक,
दूर पळत आहेत.

हाकेला ओ दिला जात होता,
आज समोरून आपलाच
प्रतिध्वनी ऐकू येत आहे.

माणसात माणुसकी जिवंत होती,
आज माणूसच माणसात,
स्वतःलाच शोधत आहे.

प्रेम त्याग एकमेकांसोबत होते,
आज त्याग प्रेमाचा करून,
स्वार्थ साधत आहेत.

जीवाला जीव देत होते,
आज जीव गेला तरी,
दुर्लक्षच करत आहेत.

सुख दुःख अश्रू आणत होते,
सुख शोधून सापडत नाही,
दुःखाने अश्रू गोठत आहेत.
दुःखाने……!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर,
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा