*शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी जाणून घेतली बांदानं.१केंद्रशाळेतील उपक्रमांची यशोगाथा*.
*बांदा*
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक स्कूल सातारा येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय शिक्षण परिषद मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेतील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
बांदा केंद्रशाळेची यशोगाथा शाळेचे उपक्रमशील शिक्षक व महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री जे.डी.पाटील यांनी सादर केली.
निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी ही शिक्षण परिषदेत आयोजित करण्यात आला होती. तब्बल चार तास चाललेल्या या शिक्षण परिषदेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, शिक्षण संचालक राहुल रेखावार सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डाएटचे प्राचार्य विविध जिल्ह्यांतील उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी शाळेतील बांदा केंद्र शाळेतील बैलगाडी तून विद्यार्थ्यांचा मिरवणूक काढून साजरा करण्यात येणारा शाळा प्रवेशोत्सव,बांधावरची शाळा, स्काऊट गाईड उपक्रम,शाळेचा वाढदिवस, विविध ठिकाणच्या क्षेत्रभेटी आदी सहशालेय उपक्रमांचे कौतुक करत बांदा केंद्र शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री यांनी सांगितले व बांदा केंद्र शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळां व्यवस्थापन समिती यांचे कौतुक केले. बांदा केंद्र शाळेची यशोगाथा सादरीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी गणपती कळमकर, डाएट चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, समग्र प्रकल्प अधिकारी स्मिता नलावडे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुख्याध्यापक शांताराम असनकर, शाळां व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांचे सहकार्य लाभले.

*सातारा येथील शिक्षण परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बांदा केंद्र शाळेची सादरीकरण करताना जे.डी.पाटील*
