You are currently viewing दोडामार्ग मध्ये उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर

दोडामार्ग मध्ये उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर

दोडामार्ग मध्ये उद्या मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर*

भाजपा दोडामार्ग आणि सी पी ए ए मुंबई यांचे आयोजन : पिंपळेश्वर हॉल मध्ये होणार शिबीर*

दोडामार्ग

दोडामार्ग मध्ये उद्या ३ मे रोजी सकाळी ८:३० वाजता पिंपळेश्वर हॉल येथे मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची तपासणी होणार असून त्याचे निदान केले जाणार असल्याची माहिती कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, या शिबिरात जनरल सर्जरी, तोंडीच्या पोकळीची दृश्य तपासणी -बकल म्यूकोसा, कडक आणि मऊ टाळु, जीभ आणि कर्करोगांपूर्वीच्या जखमांसाठी जिंन्जीव्हा, मान, नाक, तोंड, घसा, कर्करोग, तोंडाचा कर्करोग, गर्भाशय, स्तनांचा कर्करोग आदी व्याधीची तपासणी होणार आहे, यात डॉ. सतीश काणेकर(, जनरल फिजिशियन), डॉ. संजय घिल्डीयाल (नाक, कांण,घसा), डॉ. वीणा बोरकर(फिजिशियन), डॉ.रचना मेहरा (स्त्री रोग तज्ञ), डॉ.निता मोरे (समुदेशक, कार्यकारी संचालक,सी पी ए ए), डॉ.मीनल परब(सहसंचालिका,सी पी ए ए) यांची प्रमुख उपस्थिती या शिबिराला असणार आहे.
तरी तालुक्यातील अधिका अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा दोडामार्ग च्या वतीने नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा