सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी – भवानीवाडी येथील सावंत-भोसले कुळाची कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २ मे ला सकाळी ८ वा. मानसन्मान, १० वाजल्यानंतर ओट्या भरणे, दुपारी ३.३० वा. महाप्रसाद, रात्री ८ वाजता मांड भरणे, ११ वा. गोंधळी पूजन, तसेच ३ मे ला सकाळी ६.३० वाजता गोंधळाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश सावंत-भोसले, पुंडलिक सावंत-भोसले व समस्त भवानीवाडीकर सावंत-भोसले परिवाराकडून करण्यात आले आहे
२ मे रोजी कुणकेरी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव
- Post published:एप्रिल 29, 2025
- Post category:धार्मिक / बातम्या / विशेष / सावंतवाडी / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावरवाड येथील दुर्धर आजाराने ग्रस्त अक्षय फाटक याला महाराष्ट्र शासन शिक्षक समिती मालवण यांचा मदतीचा हात
भाजपा नेते विशाल परब यांची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना गणेशोत्सवी सदिच्छा भेट
शिरवल ग्रा.पं. सदस्य पांडुरंग गुरव यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
