You are currently viewing नेरूर येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नेरूर येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा-नेरूर यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ जूलैला सकाळी ८ वाजता श्री देव कलेश्वर मंदिर, नेरूर येथे ‘लघुरूद्र व दुग्धाभिषेक’ करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी श्रींच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजता युवासेना नेरूर यांच्यावतीने श्री देव कलेश्वर मंदिर, नेरूर येथे ‘दिपोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये पसरलेला दुःखाचा अंधःकार दूर होऊन सर्वांचेच जीवनमान प्रकाशमय होओ, अशी प्रार्थना श्रींच्या चरणी यानिमित्ताने करण्यात येणार आहे.

३० जुलैला सायंकाळी ३ वाजता विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कोरोना काळात वैद्यकिय सेवा बजावणारे डाॅक्टर्स, परिचारीका, आरोग्य सेवक/सेविका तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार होणार आहे.

तौक्ते वादळ व कोरोना काळात सेवा बजावणारे विद्युत महामंडळ कर्मचारी,गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ शिवसैनिक, यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक मुलांचे मातृ-पितृ छत्र हरपले आहे. अशा नेरूर ग्रामपंचायत हद्दीमधील शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना शिवसेना शाखा-नेरूर यांच्यावतीने शालेय वस्तू पुरवण्यात येणार आहे.हा कार्यक्रम नेरूर ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

नेरूरमधील सर्व शिवसैनिकांनी सामाजिक भान ठेवून गर्दी होऊ न देता कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेरूर विभाग पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − three =